अमरावती : विकासकामांवर आचारसंहितेच्या परिणामाची शक्यता
अमरावती, 23 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा निवडणूक प्रक्रियेकडे वळणार आहे. २९ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून २३ ऑक्टो
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ    ३३ हजार ९६४ शिक्षक मतदान करणार


अमरावती, 23 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा निवडणूक प्रक्रियेकडे वळणार आहे. २९ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून २३ ऑक्टोबरला मतदान आणि २७ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या प्रशासकीय प्रक्रियेवर निवडणूक आचारसंहितेचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत ३३ हजार ९६४ शिक्षकांनी नोंदणी केलेली आहे. दरम्यान, निवडणूक कार्यक्रमानुसार २९ सप्टेंबरला अधिसूचना, ६ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत, ७ ऑक्टोबरला अर्जाची छाननी आणि ९ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. २३ ऑक्टोबरला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून २७ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील सर्वच विकास कामांना तब्बल एक महिना ब्रेक लागणार आहे. मंगळवारी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच एकीकडे राजकीय हालचालींना वेग आला असून दुसरीकडे प्रशासन निवडणूक प्रक्रियेकरिता सज्ज झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande