आजोबांना राजकारण शिकवू नका; अमोल शिंदेंचा देवेंद्र कोठेंना मिश्कील टोला
सोलापूर, 23 सप्टेंबर, (हिं.स.) | भाजपमधील श्रेयवादाची लढाई रंगत असतानाच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना चांगलाच टोला लगावला आहे. “आमदार विजयकुमार देशमुख हे राजकारणातील आजोबा आहेत. आत्ता राजकारणात आलेल्या नातवांनी आ
आजोबांना राजकारण शिकवू नका; अमोल शिंदेंचा देवेंद्र कोठेंना मिश्कील टोला


सोलापूर, 23 सप्टेंबर, (हिं.स.) | भाजपमधील श्रेयवादाची लढाई रंगत असतानाच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना चांगलाच टोला लगावला आहे. “आमदार विजयकुमार देशमुख हे राजकारणातील आजोबा आहेत. आत्ता राजकारणात आलेल्या नातवांनी आजोबांना राजकारण शिकवू नये,” असा मिश्कील टोला शिंदे यांनी लगावला.

राजकारणाचा मोठा अनुभव असलेल्या नेत्यांसमोर नव्या पिढीने संयम ठेवावा, असा संदेशच शिंदे यांच्या वक्तव्यातून देण्यात आला आहे. त्यांच्या या खोचक वक्तव्यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande