
वर्धा, 23 सप्टेंबर (हिं.स.)। आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी विशेष रकाना तयार करण्यात यावा, तसेच ओबीसी समाजाची जातनिहाय लोकसंख्या व सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीची अचूक माहिती अधिकृतरीत्या संकलित करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे यांच्या मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्र सचिव मोरेश्वर भादे यांच्या आदेशानव्ये बाळाकृष्ण माउस्कर यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, ओबीसी सचिव राजेश राजूरकर, प्रदेश उपाध्यक्ष महेश तेलरांधे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष धर्पपाल ताकसांडे, प्रदेश कार्यकारी सदस्य नंदू कांबळे, मांडवगडचे माजी सरपंच रवी भुजाडे, महासचिव अनुसूचित जाती विभाग विलास जवादे, , ऋतुजा भोयर, पंचायतराज जिल्हाध्यक्ष सागर सबाने, पंकज काचोले, वैभव सूर्यवंशी, बंटी खडसे, विनोद पांडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), तालुकाध्यक्ष निलेश तिजारे, अशोक चोधरी, सारंग सबाने, वर्धा शहरध्यक्ष सुरेश ठाकरे, प्रभाकर धोटे, मनोज देशमुख, माजी उप सभापती सुभाष चांभारे, किशोर चांभारे, ऍड. नंदकुमार वानखेडे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, ओबीसी विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ओबीसी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही मागणी जर मान्य नाही झाली तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ओबीसी विभागाच्या वतीने देण्यात आला.
------------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी