छ. संभाजीनगर - कन्नड-सोयगावातील आरोग्य केंद्रांची पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। या उक्तीप्रमाणे कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचा पाहणी दौरा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांचे ओएसडी तथा नोडल अधिकारी सांगळे यांच्या समव
छ. संभाजीनगर - कन्नड-सोयगावातील आरोग्य केंद्रांची पाहणी


छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। या उक्तीप्रमाणे कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचा पाहणी दौरा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांचे ओएसडी तथा नोडल अधिकारी सांगळे यांच्या समवेत आमदार संजना जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आला.

या पाहणी दौऱ्यात आरोग्य सेवेत येणाऱ्या विविध अडचणी व त्रुटी जाणून घेत त्यांचा जागेवरच निपटारा करण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. ग्रामीण रुग्णालय, कन्नड येथे पाहणी करत असताना नागरिकांनी येथील एक्स-रे मशीन गेल्या तीन-चार महिन्यांपासून बंद असल्याची तक्रार केली. त्यामुळे रुग्णांना एक्स-रेसाठी खासगी रुग्णालयात जावे लागत असून त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande