म्हाडा नाशिक मंडळातर्फे ३३३ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात
मुंबई, 23 सप्टेंबर (हिं.स.) - नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिक शहर परिसरातील पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, मखमलाबाद शिवार, चुंचाळे शिवार, आडगाव शिवार, सातपूर शिवार व अहिल्यानगर येथील म्हाडा गृहनिर्माण योजनेतील विविध ग
म्हाडा नाशिक सोडत


म्हाडा नाशिक सोडत


मुंबई, 23 सप्टेंबर (हिं.स.) - नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिक शहर परिसरातील पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, मखमलाबाद शिवार, चुंचाळे शिवार, आडगाव शिवार, सातपूर शिवार व अहिल्यानगर येथील म्हाडा गृहनिर्माण योजनेतील विविध गृहप्रकल्पांतील ३३३ सदनिका विक्रीसाठी संगणकीय सोडत मंगळवारी नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती श्री. रंजन ठाकरे यांच्या हस्ते काढण्यात आली.

नाशिक मंडळाच्या राम गणेश गडकरी चौकातील कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. शिवकुमार आवळकंठे, उपमुख्य अधिकारी श्री. प्रवीण बागूल, मिळकत व्यवस्थापक श्री. नितिन कुलथे, उच्चस्तरीय देखरेख समितीचे सदस्य श्री. प्रकाश महाजन, उपजिल्हाधिकारी व विशेष भूसंपादन अधिकारी श्री. रविंद्र भारदे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री. विक्रम नैन, मिळकत व्यवस्थापक श्री. नितिन कुलथे आदी उपस्थित होते. सोडतीसाठी एकूण ४९३ अर्ज प्राप्त झाले तर अनामत रकमेसह ३४१ अर्ज प्राप्त झाले.

याप्रसंगी श्री. रंजन ठाकरे म्हणाले की, गेल्या दीड वर्षात म्हाडाच्या नाशिक मंडळाने सोडतीद्वारे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिली आहेत. आजच्या सोडतीद्वारे ३३३ अर्जदारांची गृहस्वप्नपूर्ती होत आहे. भविष्यात नाशिक मंडळातर्फे सदनिका विक्रीसाठी अशाच प्रकारे सदनिका विक्रीसाठी संगणकीय सोडत काढण्यात येणार असून आजच्या सोडतीत घर न लागलेल्या अर्जदारांनी निराश न होता या सोडतीत सहभागी होण्याचे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले.

यावेळी सभागृहात उपस्थित विजेत्या अर्जदारांचा सभापती श्री. रंजन ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अर्जदारांना सोडत घरबसल्या बघण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी म्हाडातर्फे सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या अधिकृत @mhadaofficial या यूट्यूब तसेच फेसबुक चॅनलवरून करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande