बदनापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची खा. डॉ. कल्याण काळेंकडून पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी बदनापूर तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा केला. बदनापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी दौरा करून पावसाचे प्रमाण, पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती तस
अ


छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी बदनापूर तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा केला. बदनापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी दौरा करून पावसाचे प्रमाण, पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती जाणून घेतली. पावसाच्या खंडामुळे मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी यावेळी संवाद साधला.

यावेळी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. दुष्काळी परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधित यंत्रणेशी चर्चा करण्यात आली.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande