
नांदेड, 23 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेच्या अध्यक्षपदी नांदेडचे सुप्रसिद्ध वैद्यक तज्ज्ञ डॉ. संजय कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे
नांदेडला या सर्वोच्च पदावर प्रथमच मिळालेले प्रतिनिधित्व ही संपूर्ण नांदेडच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. या निवडीचे वृत्त समजल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार अशोक चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला. डॉ. कदम यांच्या नेतृत्वातून राज्यातील वैद्यकीय क्षेत्राला निश्चितच नवी दिशा मिळेल, अशा शुभेच्छा खासदार अशोक चव्हाण यांनी दिल्या.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis