सोलापुरात उभारणार माता रमाईंचा पूर्णाकृती ब्राँझ पुतळा
सोलापूर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। सम्राट चौक परिसरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात येणारा माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती ब्राँझ पुतळा तयार करण्यासाठी महापालिका सभागृहातील २८ नगरसेवकांनी आपल्या मानधनातून तीन लाखांहून अधिक रक्
Jdjs


सोलापूर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। सम्राट चौक परिसरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात येणारा माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती ब्राँझ पुतळा तयार करण्यासाठी महापालिका सभागृहातील २८ नगरसेवकांनी आपल्या मानधनातून तीन लाखांहून अधिक रक्कम जमा केली होती. मात्र पुतळा निर्मितीसाठी निधी अपुरा पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी पुढाकार घेत पी.बी. ग्रुपच्या माध्यमातून शिल्पकार सुभाष आल्हाट यांना पाच लाख रुपयांची अतिरिक्त मदत केली. हा पुतळा सोलापुरात दाखल होत असल्याचे समाधान वाटते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी दिली.

सम्राट चौक परिसरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात येणारा माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती ब्राँझ पुतळा तयार होऊन मंगळवारी सोलापुरात दाखल होत आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या पुतळा उभारणीच्या प्रक्रियेला आता प्रत्यक्ष स्वरूप आले आहे. माता रमाईंचा पुतळा उभारण्यासाठी तत्कालीन शहरातील आंबेडकर अनुयायी, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात माता रमाईंचा पुतळा उभारण्याची मागणी होती. महापालिका सर्वसाधारण सभेच्या १३ जून २०२४ रोजीच्या ठरावानुसार चबुतऱ्याच्या आराखड्यास मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. शासनाच्या २ मे २०१७ रोजीच्या निर्णयाच्या आधारे प्रस्ताव मुख्य वास्तुशास्त्रज्ञांकडे पाठविण्यात आला. मुंबईतील बांधकाम भवन येथे मुख्य वास्तुशास्त्रज्ञ चेतन आक्रे व उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ अंजली मातोडकर यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन मी प्रयत्न केला आहे.

पुणे येथील ‘आल्हाट आर्ट्स स्टुडिओ’चे शिल्पकार सुभाष आल्हाट यांनी हा ब्राँझ पुतळा तयार केला आहे. महापालिकेकडून ३ लाख ५० हजार रुपयांची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. पुतळा निर्मितीचा खर्च अधिक असल्याने चंदनशिवे यांनी पाच लाख रुपयांची अतिरिक्त मदत केल्याचे आल्हाट यांनी सांगितले.पुतळा सोलापुरात दाखल झाल्याने आता प्रत्यक्ष उभारणीच्या पुढील प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिल्पकार सुभाष आल्हाट यांनी मानले आभार

सोलापूर महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात माता रमाईंचा ब्राँझ धातूचा पुतळा उभारण्यासाठी मला ३ लाख ५० हजार रुपयांची वर्क ऑर्डर मिळाली. मात्र पुतळा तयार करण्याचा खर्च अधिक असल्याने उर्वरित ५ लाख रुपयांची रक्कम ‘पी. बी. ग्रुप’चे मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांनी पी. बी. ग्रुपच्या माध्यमातून दिली. त्याबद्दल पी. बी. ग्रुप आणि आनंद चंदनशिवे यांचे शिल्पकार सुभाष आल्हाट यांनी आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande