पिंपरी-चिंचवड मनपातर्फे प्रफुल्ल पुराणिक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती
पुणे, 23 सप्टेंबर (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांची गणेशोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या जागतिक मोहिमेसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या गणेशो
पिंपरी-चिंचवड मनपातर्फे प्रफुल्ल पुराणिक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती


पुणे, 23 सप्टेंबर (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांची गणेशोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या जागतिक मोहिमेसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच उत्सवाशी संबंधित कला, परंपरा, संस्कृती आणि लोकजीवनाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी राज्य शासनातर्फे ही व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील प्रचार-प्रसिद्धीचे उपक्रम, नागरिकांचा सहभाग आणि Bappa.org या संकेतस्थळावरील सांस्कृतिक नोंदी यासाठी समन्वय साधण्याची जबाबदारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारीही नोडल अधिकाऱ्यावर राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande