अंबड येथील श्री छत्रपती गणेश मंडळ आणि पारनेर येथील रामराज्य प्रतिष्ठान गणेश मंडळ येथे लोकसंवाद संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। राज्य शासनामार्फत 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंतर्गतच महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्स
Q


छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। राज्य शासनामार्फत 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंतर्गतच महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती पोहोचविणे हा या ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचा उद्देश आहे.

अंबड येथील छत्रपती शिवाजी महाराज हाउसिंग सोसायटी हाऊसिंग सोसायटीतील श्री छत्रपती गणेश मंडळ आणि अंबड तालुक्यातील पारनेर येथील रामराज्य प्रतिष्ठान गणेश मंडळ येथे लोकसंवाद-2026 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य, पशुसंवर्धन आणि महिला बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांनी देण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी डी. एस. बोराडे यांनी यावेळी आरोग्य विभागातील योजनांची माहिती दिली. तर महिला बाल विकास विभागाचे जिल्हा प्रकल्प समन्वय संतोष दाभाडे व जिल्हा समन्वयक आकाश भवर, तसेच पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस यु तांगडे यांनी माहिती दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुणाल जाधव, मंजीत रामभाऊ गाडेकर यांच्यासह या कार्यक्रमास नागरिकांची उपस्थिती होती. सदरील लोकसंवाद कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला तसेच नागरिकांच्या शंका निराकरण करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande