जालना : आव्हाना शिवारातील पिकांच्या नुकसानीची आ. संतोष दानवेंकडून पाहणी
जालना, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतातील उभ्या पिकांची झालेली राखरांगोळी आणि संकटात सापडलेल्या बळीराजाची व्यथा जाणून घेण्यासाठी भोकरदन तालुक्यातील आव्हाना शिवारात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृश परिस्थितीची आमदार स
अ


जालना, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतातील उभ्या पिकांची झालेली राखरांगोळी आणि संकटात सापडलेल्या बळीराजाची व्यथा जाणून घेण्यासाठी भोकरदन तालुक्यातील आव्हाना शिवारात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृश परिस्थितीची आमदार संतोष दानवे यांनी पाहणी केली.

कडक ऊन आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे डोळ्यांदेखत वाळून चाललेली पिके पाहून मन हेलावून गेले. दिवस-रात्र काबाडकष्ट करून पिकवलेले पीक हातचे गेल्याने शेतकरी बांधव आज अत्यंत हवालदिल झाले आहेत. शेताच्या बांधावर बसून प्रत्येक शेतकऱ्याची कैफियत, सिंचनाची विदारक स्थिती आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न सविस्तर समजून घेतला.

संकटाच्या या काळात बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. आव्हाना शिवारासह संपूर्ण भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदार संघातील पिकांचे प्रशासनाकडून तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे व्हावेत आणि बाधित शेतकरी बांधवांना भरीव आर्थिक मदत तसेच शासनाकडून दुष्काळी सवलती लवकरात लवकर मिळाव्यात, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्काची मदत मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. याप्रसंगी गणेश पाटील ठाले यांच्यासह आव्हाना व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande