
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। आमदार संजना जाधव यांनी कन्नड-सोयगाव तालुक्यातील देवगाव रंगारी, ताडपिंपळगाव, चापानेर, हसनखेडा, कविटखेडा, औराळा, जेहूर व कोळवाडी येथे पावसाच्या खंडामुळे नुकसानग्रस्त झालेल्या खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधून पिकांचे झालेले नुकसान, पावसाअभावी निर्माण झालेल्या अडचणी तसेच आगामी हंगामातील शेतीविषयक समस्यांची सविस्तर माहिती घेतली. पावसाचा दीर्घ खंड पडल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी बांधव मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत.
शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीची शासन दरबारी प्रभावीपणे मांडणी करून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी तसेच या भागात दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. शेतकरी बांधवांच्या अडचणींच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, त्यांना आवश्यक ती मदत व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis