अमरावती : पालकमंत्र्यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)। महसुलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रतिकात्मक पुतळा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी जाळल्याप्रकरणी तसेच शासनाविरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी युवक काँग्रेसचे जिल्ह
पालकमंत्र्यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल


अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)।

महसुलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रतिकात्मक पुतळा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी जाळल्याप्रकरणी तसेच शासनाविरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्षासह १५ ते २० पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २१ सप्टेंबर रोजी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबाबत आपत्तीजनक टिप्पणी केली होती. त्यामुळे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील मुख्य रस्त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. आंदोलनकर्त्यांनी प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले.विनापरवाना आंदोलन करुन पुतळा जाळल्यामुळे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष अनिकेत ढंगले, प्रदेश महासचिव निलेश गृहे, एनएसयुआय प्रदेश उपाध्यक्ष संकेत कुलट, जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे, अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, बडनेरा विधानसभा अध्यक्ष आशिष यादव, सत्यजित विधळे आदींविरुद्ध कलम २२३,२८७ सहकलम १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande