सोलापूर - निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश
सोलापूर, 24 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी प्रशासनाला दिले आहेत. आचार
सोलापूर - निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश


सोलापूर, 24 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी प्रशासनाला दिले आहेत.

आचारसंहिता कालावधीत शासकीय विश्रामगृहाचा राजकीय बैठकांसाठी वापर करू नये, शासकीय वाहने पदाधिकारी आणि मंत्र्यांना उपलब्ध करून देऊ नयेत, तसेच आचारसंहितेच्या कक्षेत येणारे उद्घाटन आणि इतर कार्यक्रम आयोजित करू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मंत्री आणि मान्यवरांच्या दौऱ्यांसाठी स्वतंत्र व्हिडिओ पथक नियुक्त करण्याबरोबरच, माध्यमांच्या कामकाजासाठी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या समन्वयाने मीडिया कक्ष स्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande