अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेत आता संपूर्ण वंदे मातरम
अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अधिसभेच्या बुधवारच्या सभेत वंदे मातरम्या राष्ट्रीय गीताचे फक्त दोनच पद गायिल्या गेले. त्यावर आक्षेप घेताच पुढच्या सभेपासून संपूर्ण सहा कडव्यांचे वंदे मातरम् गायिले जाईल, असा निर्णय कुल
विद्यापीठ अधिसभेत आता संपूर्ण वंदे मातरम


अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अधिसभेच्या बुधवारच्या सभेत वंदे मातरम्या राष्ट्रीय गीताचे फक्त दोनच पद गायिल्या गेले. त्यावर आक्षेप घेताच पुढच्या सभेपासून संपूर्ण सहा कडव्यांचे वंदे मातरम् गायिले जाईल, असा निर्णय कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी आज जाहीर केला.

विद्यापीठअधिसभेच्या सुरूवातीला राष्ट्रगीत, वंदे मातरम्, महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत गायिले जाते. आजच्या सभेतही हे चार गीतेगायिल्या गेली. पण, वंदे मातरम्या गीताचे नेहमी प्रमाणे दोनच पदे गायिल्या गेली. संसदेने जुलै २०२६ मध्ये संमत केलेल्या नव्या कायद्यानुसार वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण सहा कडव्यांचे गायन अपेक्षित आहे. घडलेला सदर प्रकार म्हणजे वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचा एक प्रकारचा अवमानच आहे. सदर बाब लगेच सिनेट सदस्य गिरीश शेरेकर, सुनील तिप्पट यांनी सभापतींच्या लक्षात आणून दिली. त्यांनी घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पुढच्या सभेपासून वंदे मातरम् गीताचे संपूर्ण 6 कडव्यांचे गायन होईल असे निर्देश दिले.

नव्या कायद्यानुसार वंदे मातरम् या गीताला राष्ट्रगीताच्या समान कादेशीर दर्जा आणि संरक्षण देण्यात आले आहे. या विषयावर देशभरात मंथन झाले आहे. कायद्यात झालेल्या बदलाची विद्यापीठ प्रशासनाला माहिती असू नये याचे आश्चर्य अनेकांनी व्यक्त केले. संसदेत सदर विधेयक चर्चेला आले तेव्हा सखोल चर्चा झाली. त्यानंतर हे विधेयक संमत झाले आणि त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन त्याचा कायदा झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande