तिसरे अधिकारी मराठी साहित्य संमेलन : ग्रंथ पुरस्कारासाठी नामांकनाचे आवाहन
पुणे, 24 सप्टेंबर (हिं.स.)। : तिसरे राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेचा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, राष्ट्रीय पुस्तक न्यास, नवी दिल्ली,
तिसरे अधिकारी मराठी साहित्य संमेलन : ग्रंथ पुरस्कारासाठी नामांकनाचे आवाहन


पुणे, 24 सप्टेंबर (हिं.स.)।

: तिसरे राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेचा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, राष्ट्रीय पुस्तक न्यास, नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांची, तर स्वागताध्यक्षपदी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. नवलकिशोर राम यांची निवड करण्यात आली आहे. यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांची संयोजक म्हणून, तर महाराष्ट्र साहित्य परिषद आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास, नवी दिल्लीचे मा. योगेश सोमण व मा. राजेश पांडे यांची सहसंयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे.

या संमेलनाच्या निमित्ताने मागील वर्षांपासून शासकीय अधिकारी यांनी लिहिलेल्या विविध १२ साहित्य प्रकारांतील ग्रंथांना ग्रंथ पुरस्कार देण्यात येतात. ही परंपरा कायम ठेवत राज्यभरातील शासकीय अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या विविध साहित्य प्रकारांतील ग्रंथांची नामांकने मागविण्यात येत आहेत.

ग्रंथ पुरस्कारांची सविस्तर माहिती तसेच अर्ज यशदाच्या mahayashada.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी विहित पद्धतीने ग्रंथ पुरस्कारासाठी नामांकन सादर करावे, असे आवाहन ग्रंथ पुरस्कार निवड समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ग्रंथ पुरस्कार निवड समितीचे सदस्य व्यंकटेश कल्याणकर (प्रकल्प संशोधक, यशदा, पुणे) यांच्याशी मो. ७७९८७०३९५२ या क्रमांकावर संपर्क साधावा. शासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने नामांकन सादर करावेत, असे आवाहन

ग्रंथ पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तथा यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande