
छत्रपती संभाजीनगर, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
भाजपाचे आमदार नारायण कुचे यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मान देवळगाव, ता. बदनापूर येथे शेतकरी बांधवांच्या शेतावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी कृषी अधिकाऱ्यांकडून पिकांची सद्यस्थिती, संभाव्य नुकसान आणि आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
या नैसर्गिक संकटाच्या काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ला आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांचे प्रश्न योग्य व्यासपीठावर मांडणे आणि आवश्यक मदतीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे, हे यापुढेही सुरूच राहील.
यावेळी हरिश्चंद्र बाबा शिंदे, अनिलराव कोलते, पद्माकर जऱ्हाड, एकनाथ मोरे मामा, भगवान बारगजे, राम पाटील, गणेश बावणे, सुरेश मुटकुळे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते. दुष्काळी परिस्थिती, पिकांची सद्यस्थिती, संभाव्य नुकसान तसेच शेतकरी बांधवांच्या विविध अडचणींबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis