विभागीय आयुक्त श्रीकांत यांच्याशी आ. रोहित पवार यांनी केली दुष्काळाची चर्चा
छत्रपती संभाजीनगर, 24 सप्टेंबर (हिं.स.)। आमदार रोहित पवार यांनी संपूर्ण मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही भीषण परिस्थिती आहे. या पार्श्व
Q


छत्रपती संभाजीनगर, 24 सप्टेंबर (हिं.स.)।

आमदार रोहित पवार यांनी संपूर्ण मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही भीषण परिस्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन शेतकरी व शेतमजुरांना तातडीची मदत, रखडलेला पीकविमा, कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांचे ₹५० हजार प्रोत्साहनपर अनुदान तातडीने देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार आणि शेतमजुरांना प्रत कुटुंब ₹२५ हजार मदत देण्याची मागणीही केली.

यावेळी आ. संजय वाकचौरे, विश्वजीत चव्हाण, राजेंद्र म्हस्के, पंकज नाना बोराडे, पांडुरंग तांगडे पाटील, संजय काळभांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande