सोलापूर महापालिका सभागृहाबाहेर सुरक्षा जाळी बसवा; नगरसेविका पवार यांची आयुक्तांकडे मागणी
सोलापूर, 24 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका इमारतीतील सभागृहाच्या बाहेरील मोकळ्या जागेत नागरिक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी भक्कम सुरक्षा जाळी बसवावी, अशी मागणी नगरसेविका श्रद्धा पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. महापालिका कार्या
Jdjd


सोलापूर, 24 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका इमारतीतील सभागृहाच्या बाहेरील मोकळ्या जागेत नागरिक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी भक्कम सुरक्षा जाळी बसवावी, अशी मागणी नगरसेविका श्रद्धा पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

महापालिका कार्यालयात विविध कामांसाठी दररोज शेकडो नागरिक तसेच कर्मचारी येत असतात. सभागृहाच्या बाहेरील भागात तसेच उंचीवरील मोकळ्या जागेतून अपघाती पडण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.

संभाव्य अपघात किंवा अन्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागामार्फत या परिसराचे तात्काळ सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी मजबूत सुरक्षा जाळी बसवावी. त्यामुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळून संभाव्य धोका टाळता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाला तातडीने पाहणी करून सुरक्षा जाळी बसविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नगरसेविका श्रद्धा पवार यांनी आयुक्तांकडे केली

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande