सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रॉस-कंट्री स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, 24 सप्टेंबर (हिं.स.)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे शहर क्रीडा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली २०२६-२७ ची आंतरमहाविद्यालयीन क्रॉस-कंट्री (मुले व मुली) स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आयोजन श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्
Nxjd


पुणे, 24 सप्टेंबर (हिं.स.)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे शहर क्रीडा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली २०२६-२७ ची आंतरमहाविद्यालयीन क्रॉस-कंट्री (मुले व मुली) स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आयोजन श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते.

स्पर्धेत पुणे शहरातील मुलांच्या गटात २४ महाविद्यालयांतील एकूण ९० खेळाडूंनी, तर मुलींच्या गटात १४ महाविद्यालयांतील एकूण ५० महिला खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग कारकर तसेच श्री शाहू मंदिर महाविद्यालयाचे कला शाखा विभागप्रमुख डॉ. रमेश देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.स्पर्धेतील विजेत्या खेळाडू व संघांचा बक्षीस वितरण समारंभ श्रीमती उमा गुरव, श्रीमती गुरबन कौर, डॉ. राघव अष्टेकर, डॉ. सुदाम शेळके, डॉ. अभिजीत परसे आणि डॉ. अनिरुद्ध शर्मा यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पुणे शहर क्रीडा समितीचे पदाधिकारी तसेच विविध महाविद्यालयांतील क्रीडा अधिकारी, प्राध्यापक आणि खेळाडू उपस्थित होते.

कार्यक्रमास डॉ. दीपक शेंडकर, डॉ. अय्याज शेख, डॉ. सुजित पवार, श्री विजय बेंगळ, डॉ. मनीषा कोंढरे, डॉ. पल्लवी तरडे, मानसी पाटणकर आणि जयश्री बागे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन सचिव डॉ. सुदाम शेळके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिरुद्ध शर्मा यांनी केले, तर त्यांनीच आभार प्रदर्शन केले.

स्पर्धेचा निकाल

सांघिक विजेतेपद – मुले

प्रथम क्रमांक : श्री शाहू मंदिर महाविद्यालय

द्वितीय क्रमांक : चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय

तृतीय क्रमांक : मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर

सांघिक विजेतेपद – मुली

प्रथम क्रमांक : सेंट मिरज महाविद्यालय

द्वितीय क्रमांक : फर्ग्युसन महाविद्यालय

तृतीय क्रमांक : गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स

वैयक्तिक निकाल

मुले :

१) करण अनिल भोये - सर परशुरामभाऊ कॉलेज 33.44.03

२) तनिष विजय देसाई – संस्कार मंदिर महाविद्यालय 33.49.78

३) धोनी आनंद पासवान - नौरोजी वाडिया महाविद्यालय 35.24.24

मुली :

१) वैष्णवी सुनील खाडे- नेस वाडिया कॉलेज : 44.10.62

२) अवनी अमित आपटे- आबासाहेब गरवारे कॉलेज : 47.12.24

३) नीतू सेन- चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन : 52.08.62

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande