
छत्रपती संभाजीनगर, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महिलांच्या कर्जावरील व्याज माफ करण्याची मागणी केली आहे. आमदार पवार म्हणाले की,
दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान दाभरूळ (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) गावात बचत गटाच्या महिला भगिनींची भेट झाली असता त्यांनी त्यांची व्यथा मांडली. दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम नसल्याने उत्पन्न मिळण्याचा मार्गच सध्या त्यांच्याकडे शिल्लक नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणंही अत्यंत कठीण झालंय. अशा परिस्थितीत महिला बचत गटातील सदस्यांनी विविध बँका/वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या गृहउपयोगी कर्जाचे हप्ते फेडणं त्यांना बिलकूल शक्य नाही. पण कर्ज पुरवठादार संस्थांकडून मात्र हप्त्यांसाठी वारंवार त्यांच्याकडे तगादा लावण्यात येत असल्याने या महिलांमध्ये अत्यंत चिंतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने या महिलांच्या कर्जावरील एक वर्षाचं व्याज माफ करून पुढील वर्षी हातात पीक आल्यानंतरच हप्ते घेण्याच्या सूचना संबंधित वित्तीय संस्थांना द्याव्यात,
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis