मेळघाटात लसीकरण सत्र रामभरोसे
अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)। मेळघाटातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत येणाऱ्या अनेक उपकेंद्रांमध्ये दरमहा आयोजित होणारी लसीकरण सत्रे डॉक्टर व आरोग्य पर्यवेक्षकांच्या अनुपस्थितीत केवळ आरोग्यसेविकांच्या भरवशावर सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. तथा
मेळघाटातात लसीकरण सत्र रामभरोसे


अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)।

मेळघाटातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत येणाऱ्या अनेक उपकेंद्रांमध्ये दरमहा आयोजित होणारी लसीकरण सत्रे डॉक्टर व आरोग्य पर्यवेक्षकांच्या अनुपस्थितीत केवळ आरोग्यसेविकांच्या भरवशावर सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. तथापि, एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जबाबदारी नेमकी कोणाची? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. लसीकरणानंतर काही बालकांना ताप, अस्वस्थता किंवा इतर तातडीच्या आरोग्यविषयक तक्रारी उद्भवू शकतात, अशावेळी वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास उपकेंद्रावर डॉक्टरच उपलब्ध नसतील तर तत्काळ उपचार कोण करणार?, केवळ लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे एवढीच प्रशासनाची जबाबदारी आहे का? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे. मेळघाटातील दुर्गम भागात आरोग्य सुविधांचा अभाव असताना लसीकरण सत्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळाची उपस्थिती आणखी महत्त्वाची ठरते. मात्र अधिकारी उपस्थित नसल्याचे चित्र कायम राहिले तर लसीकरणाच्या गुणवत्तेसोबतच बालकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘स्पॉट चेक’ करावा

मेळघाटातील उपकेंद्रांवरील लसीकरण सत्रांची अचानक तपासणी करून डॉक्टर, आरोग्य पर्यवेक्षक व संबंधित कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित आहेत की नाही, याची खातरजमा करावी. अनुपस्थिती आढळल्यास त्याची कारणमीमांसा घेऊन जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande