विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार नागपूर कराराची होळी
अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)। अमरावती शहरासह नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे, धामणगाव, चांदूरबाजार, तिवसा, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, अचलपूर, धारणी, चिखलदरा, वरुड मोर्शी या ठिकाणी फसव्या नागपूर कराराची होळी करण्याचा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समि
विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार नागपूर कराराची होळी


अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)।

अमरावती शहरासह नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे, धामणगाव, चांदूरबाजार, तिवसा, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, अचलपूर, धारणी, चिखलदरा, वरुड मोर्शी या ठिकाणी फसव्या नागपूर कराराची होळी करण्याचा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विदर्भ राज्य आंदोलन समितीची जिल्हा बैठक बाबूजी ताजने सभागृह येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संबंधितांवर जबाबदारी सोपविण्यात आली. या बैठकीला पश्चिम विदर्भ प्रमुख प्राचार्य डॉ. पृथ्वीराज राजपूत व महिला आघाडी अध्यक्षा प्राध्यापक मंजुषा तिरपुडे, आयुब शेख, शंकरराव पारे विभागीय अध्यक्ष, दिलीप भोयर जिल्हा समन्वयक, अकोला जिल्हा प्रमुख भटकर यांनी मार्गदर्शनपर भाषणे झाली. दोन ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून वर्धा येथे होणाऱ्या विदर्भ संकल्प मेळाव्यास हजर राहण्याचे आवाहन वामनराव चटप यांनी बैठकीत केले. या बैठकीत जिल्हाप्रमुख राजेंद्र आगरकर, महानगर प्रमुख रियाज खान, पद्मा राजपूत, जिल्हा महिला अध्यक्ष सुषमा मुळे, अशोक हांडे, दिनकर निस्ताने, बाळकृष्ण राऊत, अफसर भाई, सतीश प्रेमलवार धनराज गजभिये, पिंटू, जंजाळ, ज्योती बाळकृष्ण राऊत, उपसरपंच साहेबराव इंगळे, सत्यप्रकाश गुप्ता, अनिल वानखडे, शेख बशीर भाई, संकेत चौधरी, पश्चिम विदर्भ सोशल मीडिया प्रमुख सागर राऊत यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande