नांदेड : नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये- पोलीस अधीक्षक
नांदेड, 03 सप्टेंबर (हिं.स.)।गणेशोत्सव शांततेत व सर्वधर्मसमभावाने पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सोशल मीडियावरील संदेश व पोस्टची सत्यता पडताळून पाहावी. उत्सव काळात कोणती
नांदेड : नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये- पोलीस अधीक्षक


नांदेड, 03 सप्टेंबर (हिं.स.)।गणेशोत्सव शांततेत व सर्वधर्मसमभावाने पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सोशल मीडियावरील संदेश व पोस्टची सत्यता पडताळून पाहावी. उत्सव काळात कोणतीही दुर्घटना अथवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही नागरिकाने कायदा हातात घेऊ नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले.

नांदेड जिल्ह्यातील एका बैठकीत बोलताना पोलीस अधीक्षकांनी सांगितले की नागरिकांनी शांतता ठेवावी आणि सहकार्य करावे.सर महोत्सवाच्या कार्यकाळात नागरिकांनी कोणताही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन देखील त्यांनी केलेगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही व आवश्यक नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande