
छत्रपती संभाजीनगर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील भांबडा येथे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत पात्र शेतकरी कर्जदारांना बेबाकी प्रमाणपत्र वितरण व नवीन पीककर्ज वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना वेळेवर पीककर्जाचा लाभ मिळवून देऊन शेतीकामाला गती देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शासनाच्या कल्याणकारी योजनांचा थेट लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आमचे प्रयत्न असेच निरंतर सुरू राहतील.
महाराष्ट्र ग्रामीण बँक, करमाड शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास परिसरातील ज्येष्ठ पदाधिकारी, बँकेचे अधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis