भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मंगळवेढ्यात शिवसेनेचे अर्धनग्न आंदोलन
सोलापूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। शहर आणि तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये वाढत असलेला भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांची मनमानी तसेच सर्वसामान्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ शिवसेना व युवासेना (उद्धव बाळा
gfd


सोलापूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। शहर आणि तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये वाढत असलेला भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांची मनमानी तसेच सर्वसामान्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ शिवसेना व युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येत आहे.

युवासेना शहरप्रमुख अरविंद ज्ञानेश्वर नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. नाईकवाडी अर्धनग्न अवस्थेत उपोषणाला बसले आहेत.

मौजे मंगळवेढा येथील गट नंबर ४३४७/३/अ मधील नगररचना विभागाच्या संशयास्पद झोन दाखल्याची चौकशी करण्यात यावी. तसेच फेरफार नंबर ४५३३६ ला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

जन्म-मृत्यू दप्तरामध्ये बेकायदेशीर फेरफार आणि कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्याच्या आरोपावरून महसूल सहाय्यक शिवाजी भोसले यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच कार्यालयातील गोपनीय अर्ज आणि संवेदनशील माहिती बाहेर लीक केल्याच्या संशयावरून शिपाई नागेश महामुनी यांची तातडीने अन्य तालुक्यात बदली करावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.

जमीन प्रकरणात एकाच विषयावर दोन परस्परविरोधी निकाल देऊन नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करत मंडळ अधिकारी धनंजय इंगोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande