लातूरमध्ये मोफत आरोग्यसेवेबाबत आढावा बैठक!
लातूर, ३ सप्टेंबर (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आंबेडकर चौक येथील नागरी आयुष्यमान मंदिरात नागरिकांसाठी मोफत दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या आरोग्यसेवेचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हा
आढावा बैठक


लातूर, ३ सप्टेंबर (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आंबेडकर चौक येथील नागरी आयुष्यमान मंदिरात नागरिकांसाठी मोफत दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या आरोग्यसेवेचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आज डॉक्टर, अधिकारी व सर्व कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य सुविधांचा दर्जा अधिक उत्तम राखण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच या सुविधेची माहिती प्रभागातील प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसार-प्रचार अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश देण्यात आले.अनेक नागरिकांपर्यंत अद्यापही या मोफत दवाखान्याची माहिती पोहोचलेली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आशा वर्कर्सच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिकांना मोफत आरोग्य सुविधांची माहिती द्यावी आणि अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. प्रत्येक नागरिकाला चांगली, दर्जेदार व वेळेवर आरोग्यसेवा मिळेल, याची विशेष काळजी घेण्याचेही निर्देश देण्यात आले.यावेळी नगरसेवक शिक्षण गायकवाड, नगरसेवक अल्लाबक्ष शेख, डॉ. कारेपूरकर, बाबा कांबळे, डॉ. शेख मॅडम, डॉ. भुतडा मॅडम, डुकरे सर, सर्व डॉक्टर व कर्मचारी, आशा वर्कर्स तसेच नागरिक उपस्थित होते.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande