
नवी दिल्ली , 07 सप्टेंबर (हिं.स.)।भारतीय वायुसेनेची ‘सारंग’ एरोबॅटिक टीम ‘अल अलामीन इंटरनॅशनल एअर शो’च्या दुसऱ्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी इजिप्तमध्ये दाखल झाली आहे. ८ ते १० सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या एअर शोमध्ये सारंग टीम आपल्या नेत्रदीपक हवाई कसरती सादर करणार आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, या प्रदर्शनातून वैमानिकांचे कौशल्य तसेच भारताची स्वदेशी एरोस्पेस क्षमता अधोरेखित होणार आहे. यावेळी सारंग टीम आपली प्रसिद्ध ‘डॉल्फिन लीप’ तसेच नवीन ‘स्पॉट स्टॉल टर्न’सारख्या थरारक हवाई कसरती सादर करणार आहे. या आंतरराष्ट्रीय एअर शोमध्ये जगभरातील हवाई दलांचे प्रतिनिधी आणि एरोस्पेस क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
स्वदेशी बनावटीच्या ‘ध्रुव’ (ALH) हेलिकॉप्टरने सज्ज असलेली भारतीय वायुसेनेची ‘सारंग’ टीम ही पाच हेलिकॉप्टरच्या साहाय्याने हवाई प्रात्यक्षिके सादर करणारी जगातील एकमेव एरोबॅटिक टीम आहे. ही टीम कठीण फॉर्मेशन मॅन्युव्हर्स, कमी अंतरावरील उड्डाणे आणि एकाच वेळी केल्या जाणाऱ्या हवाई कसरतींसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या प्रात्यक्षिकांमधून वैमानिकांचे असामान्य कौशल्य आणि शिस्त यांसोबतच भारताच्या स्वदेशी एरोस्पेस उद्योगाची क्षमता देखील पाहायला मिळते. या सहभागामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय वायुसेनेसाठी आणखी एक महत्त्वाची कामगिरी नोंदवली जाणार असून, भारत आणि इजिप्तमधील संरक्षण संबंधांनाही यामुळे नवी बळकटी मिळणार आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, या प्रदर्शनातून वैमानिकांचे कौशल्य तसेच भारताची स्वदेशी एरोस्पेस क्षमता अधोरेखित होणार आहे. यावेळी सारंग टीम आपली प्रसिद्ध ‘डॉल्फिन लीप’ आणि नवीन ‘स्पॉट स्टॉल टर्न’ ही हवाई कसरत सादर करणार आहे. या आंतरराष्ट्रीय एअर शोमध्ये जगभरातील हवाई दलांचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode