Custom Heading

महाबळेश्वरात 22 नोव्हेंबरपर्यंत अंतर्गत वाहतूक बदल
सातारा, २६ ऑक्टोबर, (हिं.स.) : महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त अधिकारानुसार म
महाबळेश्वरात 22 नोव्हेंबरपर्यंत अंतर्गत वाहतूक बदल


सातारा, २६ ऑक्टोबर, (हिं.स.) : महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त अधिकारानुसार महाबळेश्वर पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी व वाहतुकीची समस्या निर्माण होवू नये याकरिता आजपासून ते 22 नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीच्या मार्गात पुढीलप्रमाणे तात्पुरते बदल करण्यात येत असल्याचे पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी कळविले आहे.

विमल गार्डन ते नगर पालिका रोड मार्गे विमल दि महाबळेश्वर क्लब एकेरी वाहतूक राहील, दि महाबळेश्वर क्लब ते नगरपालिका रोड मार्गे विमल गार्डन सर्व वाहनांसाठी प्रवेश बंदी राहील, क्षेत्र महाबळेश्वर नाका ते डचेस रोड मार्गे नाकिंदा बस स्टॉप एकेरी वाहतूक राहील, नाकिंदा बस स्टॉप ते डचेस रोड मार्गे क्षेत्र महाबळेश्वर नाका सर्व वाहनांसाठी प्रवेश बंदी राहील, महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वर तसेच क्षेत्र महाबळेश्वर ते ऑर्थर सिटी पॉईंट या मार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी राहील.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande