ठाणे - केंद्रीय खर्च विषयक निवडणूक निरीक्षकांची माध्यम कक्षाला भेट
ठाणे, 26 एप्रिल (हिं.स.) 25-ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) राहिल गुप्ता (
ठाणे - केंद्रीय खर्च विषयक निवडणूक निरीक्षकांची माध्यम कक्षाला भेट


ठाणे, 26 एप्रिल (हिं.स.) 25-ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) राहिल गुप्ता (आयआरएस) यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयातील एकत्रित माध्यम कक्षाला भेट देऊन पाहणी केली. तसेच माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या कार्यकक्षेची माहिती घेतली.

25-ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये, एकत्रित माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, खर्च विषयक नोडल अधिकारी सत्यवान उबाळे, सहायक खर्च निवडणूक निरीक्षक श्री. पतंगे, माहिती अधिकारी नंदकुमार बलभीम वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय निरीक्षकांनी एकत्रित माध्यम कक्षाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. एकत्रित माध्यम कक्षात सुरु असलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमे, समाज माध्यमांवर ठाणे जिल्ह्यातील निवडणूक विषयक बातम्यांवर कशा प्रकारे लक्ष ठेवले जात आहे, याची माहिती घेतली. तसेच वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या निवडणूक विषयक विविध बातम्यांवर करण्यात येणारी कार्यवाहीबद्दलही त्यांनी माहिती जाणून घेतली.

एकत्रित माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी श्री. गुप्ता यांना माध्यम कक्षाच्या कामांची माहिती दिली. तसेच पेडन्यूज, माध्यम प्रमाणिकरण यासंबंधी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचीही माहिती यावेळी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande