साहित्य संमेलनात रविवारी फडणवीस लावणार हजेरी
‘गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून’ परिसंवाद वर्धा, 04 फेब्रुवारी (हिं.स.) : विद
देवेंद्र फडणवीस


‘गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून’ परिसंवाद

वर्धा, 04 फेब्रुवारी (हिं.स.) : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वर्धा येथे सुरू असलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला रविवार दिनाक 5 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सकाळी 10 वाजता आचार्य विनोबा भावे सभामंडपात ‘‘गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून’ परिसंवाद आयोजित करण्यात आला असून उपमुख्यमंत्री यावेळी विशेषत्वाने उपस्थित राहतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिल्लीचे डॉ. विनय सहस्त्रबुद्धे असून रमाकांत खलप, डॉ. प्रशांत धर्माधिकारी, भानू काळे, श्रीकांत देशमुख व देवेंद्र गावंडे यांचा परिसंवादात सहभाग राहणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व रेखा दंडिगे घिया करतील तर आभार प्रफुल्ल दाते मानतील.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande