अकोल्यात युवकावर चाकूने सपासप वार करून हत्या
अकोला, 26 मे (हिं.स.) - गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. दंगलीसह हत्
ph


ph


अकोला, 26 मे (हिं.स.) - गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. दंगलीसह हत्येच्या घटनांनी अकोला शहर हादरून गेले. पोलीस प्रशासन गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात अयशस्वी ठरत आहे. पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने अकोला शहर हादरले आहे. अकोला शहरातील कमला नेहरू नगर येथे किरकोळ वादातून एका 16 वर्षीय युवकाची धारधार चाकूने गळ्यावर डोक्यावर वार करून हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी (25 मे) रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार रोहन रणधीर सोळंके वय वर्ष अंदाजे 16 वर्ष राहणार कमला नेहरू नगर असे या युवकाचे नाव असून त्याच्या मानेवर डोक्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले. दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटना घडल्या नंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलीस आरोपीचा कसून तपास करीत आहेत तर या ठिकाणी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. नेमकी ही हत्या का झाली ? हत्येमागील कारण काय? हे पोलीस तपासात समोर येणार आहे. मात्र गेल्या काही दिवसात अकोला शहरात घडणाऱ्या अशा घटनांवर अंकुश लावण्याची गरज आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande