रायगड जिल्ह्यात अस्वच्छ जागांची स्वच्छता आणि अतिक्रमणे हटाव अभियानाचे आयोजन
रायगड, 26 मे (हिं.स.) : स्वच्छ शहराबरोबर फक्त सुशोभिकरण नाही तर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे,
रायगड जिल्ह्यात अस्वच्छ जागांची स्वच्छता आणि अतिक्रमणे हटाव अभियानाचे आयोजन


रायगड, 26 मे (हिं.स.) : स्वच्छ शहराबरोबर फक्त सुशोभिकरण नाही तर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांचा शोध घेवून त्यांचे निष्कासनही करणे आवश्यक आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी फक्त नुसते सुशोभिकरण चालणार नाही तर त्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे दूर झाली तरच खऱ्या अर्थाने शहर, रस्ते स्वच्छ राहतील. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी श्याम पोशट्टी यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध नगरपालिका क्षेत्रातील अस्वच्छ जागा स्वच्छ करण्यासाठी व अतिक्रमणे दूर करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यक्षेत्रात जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे.

अतिक्रमणमुक्त रस्ते अभियानातील रस्त्यांची माहिती पुढीलप्रमाणे :-

अलिबाग नगर परिषद हद्दीतील अलिबाग बसस्थानकालगत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते महावीर चौक, रस्त्याचे अंतर 500 मीटर,

पेण नगर परिषद हद्दीतील पेण-खोपोली रस्ता डॉ.बाबासाहेब आंबेडकर रस्ता ते पेट्रोल पंप, रस्त्याचे अंतर 850 मीटर,

उरण नगर परिषद हद्दीतील उरण वैष्णवी हॉटेल ते बोरी नाका, रस्त्याचे अंतर 1 किलोमीटर,

रोहा नगर परिषद हद्दीतील तहसिल कार्यालय, रोहा ते दमखाडी नवरत्न हॉटेल पर्यंतचा रस्ता, रस्त्याचे अंतर 1.4 किलोमीटर,

मुरुड-जंजिरा नगर परिषद हद्दीतील मुरुड एकदरा ब्रिज ते तवसाळकर पकटी, रस्त्याचे अंतर 400 मीटर,

महाड नगर परिषद हद्दीतील पिंपळपार ते भगवानदास बेकरी, रस्त्याचे अंतर 450 मीटर,

श्रीवर्धन नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भाजी मार्केट, रस्त्याचे अंतर 350 मीटर,

कर्जत नगर परिषद हद्दीतील श्रध्दा हॉटेल ते चार फाटा रस्ता, रस्त्याचे अंतर 500 मीटर,

खालापूर नगर पंचायत हद्दीतील मौजे महड येथील वरदविनायक मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण दूर करणे, रस्त्याचे अंतर 500 मीटर,

पोलादपूर नगर पंचायत हद्दीतील शेतकरी बाजार ते गांधी चौक परिसर, रस्त्याचे अंतर 500 मीटर,

म्हसळा नगर पंचायत हद्दीतील मुख्य रस्ता श्रीवर्धन गोरेगाव रोड, रस्त्याचे अंतर 500 मीटर,

तळा नगर पंचायत हद्दीतील मंदाड रोड ते चंडिका मंदिर रोड,सोनार आळी ते मुंढे वाडी रोड, रस्त्याचे अंतर 1 किलो मीटर,

माणगाव नगर पंचायत हद्दीतील कचेरी रोड ते वाकडाईदेवी मंदिर परिसर, रस्त्याचे अंतर 1.6 किलो मीटर,

पाली नगर पंचायत हद्दीतील गांधी चौक ते एसटी बस डेपो, रस्त्याचे अंतर 700 मीटर.

अभियानाच्या पार्श्वभूमीवर या अभियानात उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी, पोलीस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच आवश्यक यंत्रणा यांचा सहभाग करून घ्यावा, जेणेकरुन हे अभियान प्रभावीपणे राबविता येईल. अभियानामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील सन्माननीय लोकप्रतिनिधींचा सहभाग करून घ्यावा तसेच अभियानाच्या वेळी आवश्यक साधन सामुग्रीची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande