अमरावतीत एका शाळेचा निकाल शून्य तर 12 शाळांची स्थिती दयनीय
अमरावती, 3 जून (हिं.स.) :राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेत अमराव
अमरावतीत एका शाळेचा निकाल शून्य तर 12 शाळांची स्थिती दयनीय


अमरावती, 3 जून (हिं.स.) :राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागात एकूण १० कॉपी. बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे. परीक्षा नियमानुसार या विद्यार्थ्यांची त्या-त्या विषयाची संपादणूक रद्द करण्याची कारवाई शिक्षण बोर्डातर्फे करण्यात आली. यासह अन्य १७ विद्यार्थ्यांना निर्दोष ठरविण्यात आल्याचे अमरावती विभागीय शिक्षण बोर्डाच्या अध्यक्ष नीलिमा टाके यांनी शुक्रवारी (ता. दोन) पत्रपरिषदेत सांगितले. जिल्ह्यातील एका शाळेचा निकाल हा शून्य टक्के लागला तर १२ शाळांची निकालाची स्थितीही दयनीय असल्याची माहिती देत चिंता व्यक्त केली.

अमरावती जिल्ह्यातील ७१६ शाळांपैकी १८५ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला असून अन्य ३१२ शाळांचा निकाल ९० ते ९९.९९ टक्के आहे. उर्वरित शाळांपैकी

शाळांचा निकाल ८० ते ९० टक्के, ५२

शाळांचा निकाल ७० ते ८० टक्के, २०

शाळांचा निकाल ६० ते ७० टक्के, ११

शाळांचा निकाल ५० ते ६० टक्के, १०

शाळांचा निकाल ४० ते ५० टक्के, ४

शाळांचा निकाल ३० ते ४० टक्के, दोन

शाळांचा निकाल १० ते २० टक्के तर एका शाळेचा निकाल चक्क शून्य टक्के लागला आहे. यापैकी ७० टक्के पेक्षा कमी निकाल लागलेल्या १२ शाळांच्या निकालाची स्थिती अत्यंत वाईट असल्याने त्या शाळांतील वस्तुस्थिती तपासण्याची गरज शिक्षण बोर्डाचे प्रभारी विभागीय सचिव तेजराव काळे यांनी व्यक्त केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande