धामणगावात माजी आमदार अरुणभाऊ अडसड ॲम्बुलन्सने येऊन बजावला मतदानाचा हक्क
अमरावती, 26 एप्रिल (हिं.स.) एक महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता प्रकृती स्थिर असताना माजी आ
धामणगावात माजी आमदार अरुणभाऊ अडसड ॲम्बुलन्सने येऊन बजावला मतदानाचा हक्क


अमरावती, 26 एप्रिल (हिं.स.) एक महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता प्रकृती स्थिर असताना माजी आमदार अरूणभाऊ अडसड यांनी अमरावती येथून ॲम्बुलन्सने येऊन धामणगावात मतदानाचा हक्क बजावला. विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष माजी आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणभाऊ अडसड यांच्या कमरेवर गत महिन्यात शस्त्रक्रिया झाली आता प्रकृती स्थिर असताना त्यांनी अमरावती येथून ॲम्बुलन्सने येऊन धामणगावात मतदानाचा हक्क बजावला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या या देशात सर्वांना मतदानाचा हक्क दिला तो बजावणे गरजेचे आहे त्यामुळे आपण आजारी असतानाही मतदान करायला आलो असे त्यांनी सांगितले तर भारताच्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक, मी जबाबदार नागरिक म्हणून मतदान करीत असल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी मतदान करून प्रसारमाध्यमाला सांगितले यावेळी सामाजिक कार्यकर्ता अरुणभाऊ अडसड यांनी सहपरिवार मतदान केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande