मतदान, मगचं लग्न.. मंडपात जाण्यापूर्वी 2 नवरदेवांनी बजावला मतदानाचा हक्क
अमरावती, 26 एप्रिल (हिं.स.) लग्न… प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा, महत्वाचा क्षण. पण त्याहून
मतदान, मगचं लग्न.. मंडपात जाण्यापूर्वी 2 नवरदेवांनी बजावला मतदानाचा हक्क


अमरावती, 26 एप्रिल (हिं.स.) लग्न… प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा, महत्वाचा क्षण. पण त्याहून महत्वाचं असतं ते आपल्या राष्ट्राप्रती, आपल्या देशाप्रती असलेलं कर्तव्य. हेच लक्षात ठेवत चांदूर रेल्वे तालुक्यातील एकलारा येथील निलेश उर्फ विक्की महादेव मारबदे व खरबी मांडवगड येथील सुधीर अब्दुल औंधकर या दोन नवरदेवांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याचं मतदानाचं कर्तव्य बजावलं. लग्न मंडपात जाण्यापूर्वी, लग्नाच्या वरातीसाठी घोड्यावर बसण्यापूर्वी दोन्ही नवरदेवांनी चांदूर रेल्वे तालुक्यातील खरबी मांडवगड येथील मतदान केंद्र क्र. 357 वर गेले आणि आधी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. आधी मतदान मगच लगीन .. अशा त्यांच्या बाण्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande