भाजपाला बंडखोरीचे ग्रहण, नाशिकच्या तीन मतदारसंघात झेंडा फडकला तर चौथ्यामध्ये प्रतीक्षा
नाशिक , 18 ऑक्टोबर (हिं.स.)। - विधानसभा निवडणुकांवरून सध्या भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वातावरण तयार झाले असून नाशिक शहरातील तीनही मतदार संघामध्ये बंडखोरांनी आपल्या बंडाचा झेंडा फडकवला आहे तर देवळाली मतदारसंघांमध्ये मतदारसंघ कोणाच्या वाटेल
भाजपाला बंडखोरीचे ग्रहण, नाशिकच्या तीन मतदारसंघात झेंडा फडकला तर चौथ्यामध्ये प्रतीक्षा


नाशिक , 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

- विधानसभा निवडणुकांवरून सध्या भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वातावरण तयार झाले असून नाशिक शहरातील तीनही मतदार संघामध्ये बंडखोरांनी आपल्या बंडाचा झेंडा फडकवला आहे तर देवळाली मतदारसंघांमध्ये मतदारसंघ कोणाच्या वाटेला जातो त्यानंतर बंडखोरांची भूमिका स्पष्ट होणार असल्याने या ठिकाणी देखील भाजपला बंडखोरीचा फटका सहन करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे अवघ्या चार दिवसाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे परंतु त्यापूर्वीच महायुतीमध्ये असणारी धुसफूस चव्हाट्यावरती यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे भाजपातील नाराज असलेला बंडोबा हा पक्षातील ज्येष्ठ नेते कसा शांत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विशेष म्हणजे जे बंडखोरी करत आहेत किंवा बंडखोरीची भाषा करत आहे ते कुठल्या ना कुठल्या नेत्याशी संपर्कात आहे त्यांची धुरा वाहण्याचे काम देखील या नेत्यांनी केला आहे यातील काही बंडखोर तर पक्षाचे निष्ठावंत म्हणून बघितले जात आहे परंतु त्यांनी पण आता या वेळेस माघार न घेण्याचा निर्णय घेण्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश पाठवून आपली बंडखोरी असल्याचे पक्षाला सांगितले आहे.

नासिक पूर्व विधानसभा मतदारसंघ म्हणजे पंचवटी परिसर असून या मतदारसंघांमध्ये विद्यमान भाजपचे आमदार राहुल ढिकले हे दुसऱ्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत. मतदारसंघातील माजी नगरसेवक नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून राहिलेले आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री संकट मोचक गिरीश महाजन यांचे समर्थक म्हणून असलेले गणेश गीते यांनी त्यांना यावेळी तिकीट न मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर नाशिक पश्चिम मतदारसंघ म्हणजे सिडको सातपूर परिसरात तील हा मतदारसंघ असून कामगार वर्ग असलेल्या या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे या दोन वेळेस निवडून आलेले आहेत त्या हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत त्या ठिकाणी भाजपाचे बाळासाहेब पाटील कैलास अहिरे दिनकर पाटील स्वप्निल पाटील यांनी बैठक घेऊन सीमा हिरे यांच्या विरोधात दंड थोपटले आहे त्यामुळे या मतदारसंघातही बंडखोरीचा झेंडा हा फडकवला गेला आहे यामध्ये विशेष म्हणजे कैलास अहिरे हे माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक आहेत तर दिनकर पाटील हे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श घेऊन काम करत आहे त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये शांत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी मध्यरात्री केले होते असे दिनकर पाटील देखील नाराज आहेत या मतदारसंघांमध्ये उर्वरित असणारे स्वप्निल पाटील हे भाजपच्या एका नेत्याच्या नेहमी संपर्कात असतात तर बाळासाहेब पाटील हे देखील संकट मोचक गिरीश महाजन यांच्या संपर्कात आहेत.

नाशिक मध्य मतदारसंघ या ठिकाणी भाजपच्या दोन वेळेस निवडून आलेल्या देवयानी फरांदे यांच्या विरोधात संघापासून आत्तापर्यंत निष्ठावंत म्हणून बघितले गेलेले लक्ष्मण सावजी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट टाकून आपण बंडखोरी करीत असल्याचे घोषित केले आहे या वरतीच ते थांबले नाही तर त्यांनी आपल्याला पक्ष आणि पक्ष बाहेरचेही काही नेते कार्यकर्ते तसेच नागरिक हे मदत करणार असल्याचा दावा केला आहे त्यामुळे या मतदारसंघात हॅट्रिक करण्याच्या तयारीत असलेले फरांदे यांना या नाराजीचा किती फायदा होतो आणि किती नुकसान होतं हे आता बघावा लागणार आहे एकूणच काय तर भाजपामध्ये बंडखोरांची संख्या वाढत चालली आहे आणि ही संख्या महायुतीला अडचणीची ठरणारी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande