नाशकात वाहतूक नियंत्रणासाठी अधिसूचना जाहीर
नाशिक , 18 ऑक्टोबर (हिं.स.)। , . शहरातील मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील एन.एच.-3 महामार्गावरील धुळे बाजूकडील मार्गावर मुंबई नाका ओव्हरब्रीज पोल क्रमांक 170 ते मुंबई नाका सर्कल पावेतो रस्ता काँक्रिटीकरणाचे काम भारतीय महामार्ग प्राधिकरण यांच्या मार्फ
नाशकात वाहतूक नियंत्रणासाठी अधिसूचना जाहीर


नाशिक , 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

, . शहरातील मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील एन.एच.-3 महामार्गावरील धुळे बाजूकडील मार्गावर मुंबई नाका ओव्हरब्रीज पोल क्रमांक 170 ते मुंबई नाका सर्कल पावेतो रस्ता काँक्रिटीकरणाचे काम भारतीय महामार्ग प्राधिकरण यांच्या मार्फत सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करणे, नियंत्रण करणे व पर्यायी मार्गाने वाहतूक वळविणे यासाठी मोटार वाहन अधिनियम 1988 चे नियम 59 कलम 115, महाराष्ट्र शासन गृह विभाग एम व्ही ए-116/ सीआर/ 37/ टीआर दिनांक 27 सप्टेंबर 1996 व मुंबई पोलीस अधिनियम-1951 चे कलम 33 (1) (ब) अन्वये पोलीस उप आयुक्त चंद्राकांत खांडवी यांनी वाहतूक नियंत्रणासाठी अधिसूचना जाहीर केली आहे.

सदर अधिसूचना 16 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पावेतो 25 दिवस अंमलात असणार आहे. या अधिसूचनेचे निर्बंध पोलीस सेवेतील वाहन, रूग्ण वाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाची वाहने व अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहने यांना लागू राहणार नाहीत. या अधिसूचनेचे उल्लंघन केल्यास संबंधितावर मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 119/177, 122/177, 15 (2) (10) व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 131 (चार) (पाच) तरतुदीनसार कारवाई करण्यात येईल, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande