फिजिक्‍सवाला उच्‍च शिक्षणासाठी देशभरात ऑफलाइन अध्‍ययन केंद्रे सुरू करणार
नाशिक , 18 ऑक्टोबर (हिं.स.)। फिजिक्‍सवाला (पीडब्‍ल्‍यू) ही भारतातील आघाडीची मल्‍टीनॅशनल एडटेक कंपनी भारतात किफायतशीर, उच्‍च दर्जाच्‍या शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. या कंपनीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी देशभरात ७७ हून अधिक ऑफलाइन तं
फिजिक्‍सवाला उच्‍च शिक्षणासाठी देशभरात ऑफलाइन अध्‍ययन केंद्रे सुरू करणार


नाशिक , 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

फिजिक्‍सवाला (पीडब्‍ल्‍यू) ही भारतातील आघाडीची मल्‍टीनॅशनल एडटेक कंपनी भारतात किफायतशीर, उच्‍च दर्जाच्‍या शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. या कंपनीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी देशभरात ७७ हून अधिक ऑफलाइन तंत्रज्ञान-सक्षम अध्‍ययन केंद्रांच्‍या लाँचची घोषणा केली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना

फिजिक्वाला ऑफलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित गुप्ता म्हणाले की, आमची नवीन केंद्रे तामिळनाडू, गुजरात, जम्‍मू व काश्‍मीर, राजस्‍थान, मध्‍यप्रदेश आणि महाराष्‍ट्र या राज्‍यांमध्‍ये कार्यरत असतील. या विस्‍तारीकरणासह १४१ शहरांमध्‍ये २०३ केंद्रे असतील, ज्‍यामुळे सध्‍याच्‍या १२६ विद्यापीठ व पाठशाला केंद्रांमध्‍ये अधिक भर होईल. या धोरणात्‍मक विस्‍तारीकरणाच्‍या माध्‍यमातून पीडब्‍ल्‍यूचा दर्जेदार शिक्षण अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande