नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात असणार 303 मतदान केंद्रे
नाशिक , 18 ऑक्टोबर (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून नाशिक जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. 124- नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात 303 मतदान केंद्रे असून २० नोव्
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात असणार 303 मतदान केंद्रे


नाशिक , 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून नाशिक जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. 124- नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात 303 मतदान केंद्रे असून २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 124 -नाशिक मध्य मतदारसंघात 3 लाख 43 हजार 576 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती 124-नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्पित चौहान यांनी दिली आहे.

124-नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 74 हजार 344 पुरूष मतदार, 1 लाख 69 हजार 175 स्त्री मतदार आणि 57 तृतीयपंथी असे एकूण 3 लाख 43 हजार 576 मतदार आहेत. तसेच सैनिक मतदार संख्या 107 इतकी असून यात पुरूष मतदार 101 व स्त्री मतदार 6 आहेत. 124-नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर येथे होणार आहे.

पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी व मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून स्वीप कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली असून त्यास प्रतिसाद मिळाला आहे. मतदार नोंदणीत नागरिकांनी सहभाग नोंदविल्यामुळे विधानसभा मतदारसंघाची मतदार नोंदणी देखील वाढली आहे. नागरिकांनी आपला मतदानाचा अमूल्य अधिकार बजावून मतदान करावे, असे आवाहनही 124 नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. चौहान यांनी केले आहे.

00000

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande