आघाडीत बिघाडी?, पवारांकडून ठाकरे आणि कॉंग्रेस यांच्यात मध्यस्थी
मुंबई, २१ ऑक्टोबर (हिं.स.) : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र या दरम्यान महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि कॉंग्रेस यांच्यात बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विदर्भातील जागा आणि मुख्यमंत्री पदासाठी र
महाविकास आघाडी शरद पवार


मुंबई, २१ ऑक्टोबर (हिं.स.) : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र या दरम्यान महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि कॉंग्रेस यांच्यात बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विदर्भातील जागा आणि मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील दुवा म्हणून शरद पवार मध्यस्थी अर्थात समन्वयाची भूमिका निभावत असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार हे काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडच्या सातत्याने संपर्कात आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी रात्री उशिरा उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीवर जाऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. या माध्यमातून महाविकास आघाडीतील बिघाडीच्या बातम्या समाजात पोहोचून चुकीचा संदेश जाऊ नये, हा मुख्य उद्देश असल्याचे समजते.

महाविकास आघाडी यांच्यात जागावाटप अद्याप निश्चित झालेलं नाही. जवळपास १७ जागांवर एकमत होऊ शकलं नसल्याची चर्चा आहे. त्याचवेळी विदर्भातील ७ जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेस दोघांनी आपापले दावे केले आहेत.

दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या शेवटच्या १७ जागांवर अद्याप चर्चा बाकी आहे. काही जागांवर ठाकरे गटाशी आमचा वाद सुरू आहे. युतीत तीन पक्ष आहेत. तीन पक्षांमध्ये जागा वाटपासाठी वेळ लागतो. असंतुष्ट कार्यकर्त्यांना आपण समजून घेऊ आणि महाविकास आघाडीसोबतच निवडणूक लढवू.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande