झारखंड : इंडी आघाडीत जागा वाटपावरून मतभेद
सीपीआय (एमएल) इंडी आघाडीतून बाहेर पडला नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांमध्ये पुढच्या महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत. त
झारखंडमधील इंडी आघाडीच्या बैठकीचा फोटो


सीपीआय (एमएल) इंडी आघाडीतून

बाहेर पडला

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांमध्ये पुढच्या महिन्यात

विधानसभेची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत मतभेद निर्माण

झाले आहेत. तर दुसरीकडे झारखंडमध्ये इंडी आघाडीत फूट पडली आहे. जागावाटपावरून

झालेल्या मतभेदांमधून झारखंडमध्ये सीपीआय (एमएल) पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर

पडण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या

माहितीनुसार इंडी आघाडीमध्ये जागावाटपाबाबत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे सीपीआय

एमएल पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर

सीपीआय एमएल पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादीही प्रसिद्ध केली आहे. सीपीआय

एमएल पक्षाने राजधनवार येथून राजकुमार यादव, निरसा येथून अरुप चटर्जी आणि सिंदरी येथून

चंद्रदेव महतो यांना उमेदवारी दिली आहे. तसेच राजधनवार विधानसभा मतदारसंघातील

जागेवरून झारखंड मुक्ती मोर्चा आणि सीपीआय एमएल पक्षामध्ये मतभेद झाले होते. त्याची

परिणती सीपीआय एमएल पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडण्यात झाली.

---------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande