खंडणी प्रकरणात सचिन वाझेला हायकोर्टातून जामीन
इतर 2 प्रकरणे प्रलंबित असल्याने जेलमध्येच राहणार मुंबई, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला आज, मंगळवारी 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. या प्रकरणात माजी गृहम
सचिन वाझे


इतर 2 प्रकरणे प्रलंबित

असल्याने जेलमध्येच राहणार

मुंबई, 22 ऑक्टोबर

(हिं.स.) : बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला आज, मंगळवारी

100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. या प्रकरणात माजी गृहमंत्री

अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींना जामीन मिळाला आहे. त्याच आधारे वाझे यांनी

जामीन देण्याची विनंती केली होती. दरम्यान अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन

हत्याप्रकरणात जामीन मिळाला नसल्याने वाझेला तुरुंगातच रहावे लागणार आहे.

सचिन वाझे यांला 2020 मध्ये मनसूख हिरेन

हत्याकांड व उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानालगत

स्फोटकांनी भरलेली कार पार्क केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील रेस्टॉरंट व बारमधून दरमहा 100 कोटी रुपये गोळा

करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातही सचिन वाझेचे नाव पुढे

आले होते. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

सचिन वाझेचे वकील ऍड. रौनक नाईक यांनी रिट

याचिका केली होती. सदर याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्या. महेश सोनक आणि न्या.

जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने आज, मंगळवारी वाझेला जामीन मंजूर केला. सीबीआयच्या

विशेष न्यायालयाने गेल्यावर्षीच सचिन वाझे यांना जामीन दिला होता. पण इतर दोन

गुन्ह्यांतही ते आरोपी असल्याने गेल्यावर्षीपासून वाझेचा तुरुंगवास लांबला.

------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande