नाशिक, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। : नाशिक जिल्हा गोल्फ असोसिएशन आणि निफाड येथील रिव्हर साईड गोल्फ कोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रिव्हर साईड गोल्फ कोर्स येथे दोन दिवसीय गोल्फचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरास अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पियन खेळाडू अनिर्बान लाहिरी आणि त्यांचे प्रशिक्षक विजय दिवेचा यांनी मार्गदर्शन केले. नाशिकमध्ये आणि महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी गोल्फ या खेळाचा प्रचार - प्रसार होणे आवश्यक आहे. यासाठी विविध योजना राबवण्याच्या हेतूने येथे काय करणे आवश्यक आहे याची सखोल माहिती त्यांनी दिली. यासाठी गोल्फ खेळाचे फायदे काय आहेत याची माहिती दिली. इतर खेळामध्ये खेळाडूंना आपल्या विरुद्ध खेळाडूला पराभूत करणे हा उद्देश असतो.परंतु गोल्फ हा खेळ खेळाडूने स्वतःशीच खेळावा लागतो. तसेच गोल्फ खेळामुळे शिस्त सातत्य , आणि निसर्ग सर्वधन हे फार मोठे फायदे आहेत असे सांगितले. रिव्हर साईड गोल्फ कोर्स, नाशिक आणि बान फाऊंडेशन यांच्या वतीने खेळाडूंना अगदी माफक दरात प्रशिक्षण आणि खेळण्यासाठी आवश्याक साहित्य उपलब्ध करून देणार आहेत असेही त्यांनी सांगितले. रिव्हर साईड गोल्फ कोर्सचे संचालक विंग कमांडर प्रदीप बागमार यांनी गोल्फ ही एक इंडस्ट्री आहे.येथे खेळाडू तयार होतात परंतु त्याच बरोबर त्याला आवश्यक ते सहकार्य करणारे कॅडीज (Ball Boy's) याशिवाय संपूर्ण गोल्फ कोर्सची देखभाल करण्यासाठी लागणारे मनुष्य बळ आणि प्रशिक्षक या सर्वांचा अंतर्भाव असतो. त्यामुळे गोल्फ खेळण्यासाठी येणाऱ्या अडचणी म्हणजे मोठे क्रीडांगण, साहित्य जसे की, बॉल्स, गोल्फ क्लबज, आणि कॅडीज,(बॉल boy's) यांची उपलब्धता होणे आवश्यक आहे अशी माहिती त्यांनी दिली. गोल्फचे अंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजय दिवेचा हे स्वतः बगलोर येथे आणि कलहार येथे स्वतःचे गोल्फ प्रशिक्षण केंद्र आहे.यांच्या प्रशिक्षण केंद्रातून नावाजलेले अंतरराष्ट्रीय खेळाडू जसे की येथे उपस्थित असलेले अनिर्बान लाहरी, चिका रगाप्पा,उदयन माने यासारखे खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. यांचा मुख्य उद्देश शालेय विद्यार्थ्यांना गोल्फ प्रशिक्षण देणे आहे, जेणेकरून गोल्फ हा खेळ ग्रास रूट पर्यन्त जाईल, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी क्रीडा संघटक अशोक दुधारे आणि आनंद खरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिल्हा गोल्फचे सरचिटणीस आणि प्रशिक्षक नितीन हिंगमिरे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI