F-35 फायटर जेट्ससह इस्रायलचा इराणवर भीषण हवाई हल्ला
तेहरान , २६ऑक्टोबर (हिं.स.) : १ ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा असून त्यानंतर इस्रायलने २६ ऑक्टोबर रोजी मोठ्या हवाई हल्ल्याद्वारे प्रत्युत्तर दिले. जगातील सर्वात अत्याधुनिक F-35 फायटर जेट्सचा वापर करून १००
इराण


इराण


तेहरान , २६ऑक्टोबर (हिं.स.) :

१ ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा असून त्यानंतर इस्रायलने २६ ऑक्टोबर रोजी मोठ्या हवाई हल्ल्याद्वारे प्रत्युत्तर दिले. जगातील सर्वात अत्याधुनिक F-35 फायटर जेट्सचा वापर करून १०० फायटर जेट्स इस्रायलच्या सैन्याने (IDF) हा हल्ला आत्मसंरक्षणासाठी आवश्यक असल्याचे सांगितले.

इस्रायली फायटर जेट्स विशेषतः F-35 अत्याधुनिक आणि अत्यंत वेगवान आहेत त्यांनी अंदाजे २००० किलोमीटरचा प्रवास करून इराणमधील महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला. अमेरिकेने तयार केलेले F-35 विमान केवळ निवडक देशांकडेच आहेत. हे जगातील अत्यंत अद्ययावत फायटर जेट्स आहेत.

IDF ने सांगितले की या हल्ल्यात इराणची राजधानी तेहरान आणि करज या शहरांवर लक्ष्य केले गेले. परंतु आण्विक आणि तेल सुविधांवर हल्ला केला नाही.

इराणी माध्यमांनी पहाटेच्या सुमारास स्फोटांचे आवाज आल्याचे नमूद केले असले तरी इराणने या हल्ल्याची गंभीरता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

हल्ल्यापूर्वी अमेरिकेला याची माहिती देण्यात आली होती. मात्र अमेरिकेने थेट सहभाग घेतला नाही. इराणकडून किंवा त्याच्या समर्थकांकडून प्रत्युत्तराची शक्यता असल्यामुळे कारवाईनंतर इस्रायलने हाय-अलर्ट घोषित केला. इराणच्या प्रॉक्सी संघटना म्हणजे इराक, यमन, सीरिया आणि लेबनॉनमधील गट, इस्रायलवर हल्ला करू शकतात. यामुळे ही सावधानता बाळगण्याता आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao


 rajesh pande