पुणे, 26 ऑक्टोबर (हिं.स.)।
पोलिसांनी खडक परिसरात शुक्रवार पेठेतील मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून नंदू नाईक याच्यासह सुमारे ६० जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून ४७ मोबाईल आणि एक लाखाची रोकड जप्त केली आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शहरातील अवैध धंद्यांवर बऱ्यापैकी नियंत्रण आले आहे. परंतु काहीजण चोरून अवैध धंदे चालवत असल्याचे समोर आले आहे. खडक परिसरात नंदू नाईक मटका जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु