
परभणी, 27 डिसेंबर (हिं.स.)। तहसीलदारांच्या पथकाने कुपटा शिवारात तर प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रतिभा गोरे यांच्या पथकाने वालूर ते मोरेगाव रस्त्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेत कारवाई केली. एक ट्रॅक्टर गौण खनिज पथकाकडून तहसील कार्यालयात लावले. तर दुसरे ट्रॅक्टर तहसीलमध्ये लावले. पुढे दंड आकारणीची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis