एक डाव भुताचा अवघ्या ९९ रुपयांमध्ये पाहण्याची अनोखी संधी
मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। सगळीकडे सध्या चर्चेत असलेल्या आणि उद्या म्हणजेच ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या एक डाव भुताचा हा चित्रपट अवघ्या ९९ रुपयांमध्ये केवळ पहिल्या दिवशी पाहण्याची अनोखी संधी रसिक प्रेक्षकांना चित्रपटाच्या मिळणार आहे.
एक डाव भुताचा अवघ्या ९९ रुपयांमध्ये पाहण्याची अनोखी संधी


मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।

सगळीकडे सध्या चर्चेत असलेल्या आणि उद्या म्हणजेच ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या एक डाव भुताचा हा चित्रपट अवघ्या ९९ रुपयांमध्ये केवळ पहिल्या दिवशी पाहण्याची अनोखी संधी रसिक प्रेक्षकांना चित्रपटाच्या मिळणार आहे.

रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने एक डाव भुताचा या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, आशय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांनी गाणी गायली आहेत.

स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरूण आणि मुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेलं भूत यांच्यातील धमाल गोष्ट एक डाव भुताचा' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande