हिमाचल प्रदेशात आता घरातील शौचालयावर टॅक्स
शिमला, 03 ऑक्टोबर (हिं.स.) : हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारने आता घरातील शौचालयांवर टॅक्स लावण्याची घोषणा केलीय. आर्थिक संकटात सापडलेल्या राज्य सरकारने महसूलात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेतला असून राज्यातल्या शहरी भागातल्या घरातील शौचालयावर लागू करा
राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सुखू यांचा संग्रहित फोटो


शिमला, 03 ऑक्टोबर (हिं.स.) : हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारने आता घरातील शौचालयांवर टॅक्स लावण्याची घोषणा केलीय. आर्थिक संकटात सापडलेल्या राज्य सरकारने महसूलात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेतला असून राज्यातल्या शहरी भागातल्या घरातील शौचालयावर लागू करावयाच्या टॅक्सचे दरपत्रकही जाहीर झाले आहे. हिमाचल प्रदेशच्या जलशक्ती विभागाकडून राज्याच्या शहरी भागातील प्रत्येक घरातून शौचालय कर वसूल केला जाणार आहे. या अंतर्गत घरांमध्ये बसवलेल्या प्रत्येक शौचालयावर दर महिना 25 रुपये कर आकारण्यात आला आहे. म्हणजेच घरात जितकी जास्त शौचालये बांधली जातील तितका अधिक कर वसूल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande