रत्नागिरी जिल्ह्यात १० उमेदवारी अर्ज अवेध
रत्नागिरी, 30 ऑक्टोबर, (हिं. स.) : विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर आज जिल्ह्यातील पाचपैकी रत्नागिरी वगळता इतर चार विधानसभा मतदारसंघामधील १० उमेदवारी अर्ज अवैध ठरले, तर ४५ अर्ज वैध ठरले. कोणत्याही प्रमुख उमेदवारा
रत्नागिरी जिल्ह्यात १० उमेदवारी अर्ज अवेध


रत्नागिरी, 30 ऑक्टोबर, (हिं. स.) : विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर आज जिल्ह्यातील पाचपैकी रत्नागिरी वगळता इतर चार विधानसभा मतदारसंघामधील १० उमेदवारी अर्ज अवैध ठरले, तर ४५ अर्ज वैध ठरले. कोणत्याही प्रमुख उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला नाही.

अवैध ठरलेले अर्ज असे - दापोली अनंत पांडुरंग जाधव - राष्ट्रीय समाज पक्ष (सूचक नसल्यामुळे). गुहागर - जाधव विक्रांत भास्कर (मुख्य उमेदवाराचा अर्ज वैध ठरल्याने व फक्त एकच सूचक दिल्याने), ⁠दीपक केशव शिगवण (शपथ घेतली नाही व विहित ॲफिडेव्हिट दाखल केले नाही), ⁠सुनील सुधीर काते (ॲफिडेव्हिट स्टॅंपपेपरवर नाही व नोटरी केलेले नाही), ⁠सादिक मुनीरुद्दीन काझी (पुरेसे सूचक नाहीत / अनामत जमा केली नाही/ ॲफिडेव्हिट अपूर्ण). चिपळूण - संतोष शिंदे - समाजवादी पार्टी , स्वप्ना प्रशांत यादव - नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार, अमित रोहिदास पवार - अपक्ष, सुनिल वेतोस्कर – अपक्ष. राजापूर - अविनाश शांताराम लाड - एबी फॉर्म नसल्याने अवैध.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande